भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली

jara karnamulin sangon ali goshti | mrutyachiye bheti javali ali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥ आतां माझ्या मना होई सावधान । ॐपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥ शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥ तुका म्हणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥३॥