भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें

janmantarincha parit nhavi | jat thevi tyanen ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें॥१॥ वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥ध्रु.॥ पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥२॥ तुका म्हणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥३॥