भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची

jaya shirin karabhar | buddhi sar tayachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची ॥१॥ वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥ आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥२॥ तुका म्हणे शूर राखे । गांडया वाखे सांगातें ॥३॥