भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥ भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥ मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूंनी । उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥ नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥ नाहीं भेद म्हणून भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

घटीं अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥ भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥ वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

घरोघरीं अवघें लें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥ निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुश्चित्ती । कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥१॥ लावूनियां हात कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम