भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया

ghaliti pavhaya | vate anathachya daya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥ तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आम्हां तारूं ॥ध्रु.॥ रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥ बुडत्यासाटीं उडी । घालितील कां हे जोडी ॥३॥ झाडिताती कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥४॥ तुका म्हणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥