भजनी मालिका
← भजनांकडे परत

घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं

ghadiya ghaluni talin chalati vanamali | umatati komalin kunkumachin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥ वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥ पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं नो बोलावें ॥२॥ तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥३॥