भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा

goho yava ganva | aise navas kari ava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥ कैचें पुण्य तिये गांठी । व्रतें वेची लोभासाठी ॥ध्रु.॥ वाढावें संतान। गृहीं व्हावें धनधान्य ॥२॥ मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥३॥ तुका म्हणे मोल । देउन घेतला सोमल ॥४॥