भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते

govindavanchoni vade jyachi vani | hagavan ghani pitapit te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥ मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥ अंगभूत ह्मूण पूजितो वाहाणा । म्हणतां शाहाणा येईल कैसा ॥२॥ तुका म्हणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥३॥