भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि

ghaluniyan bhar rahilon nishchitin | niravilen santin vithobasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥१॥ लावूनियां हात कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥ कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरें तीरीं उभा ॥२॥ खुंटले सायास अणिक या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥३॥ तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥