भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव

govindachen nam god ghetan vache | tethen he kainche vairabhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥ भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरी ॥२॥ वरी हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या ॥३॥ सकळ ही वरी बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा म्हणे घरा ॥४॥ राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥५॥ छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥६॥ त्यांच्या तुका म्हणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥