भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्हो एकली रे तुजसवें चुकलें रे । भय वाटे जनीं मज अबळा धाकली रे

kanho ekali re tujasaven chukalen re | bhay vate janin maj abala dhakali re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कान्हो एकली रे तुजसवें चुकलें रे । भय वाटे जनीं मज अबळा धाकली रे ॥१॥ निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥ लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥२॥ पिकल्या बोरी झालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥३॥ आड खुंट झालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥४॥ तुका म्हणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥५॥