भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळे

kanhaya re jagajethi | dei bheti ekavele

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळे ॥१॥ काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥ येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥२॥ तुका म्हणें पाहिलें मागें । एवढया वेगें अंतरला ॥३॥