भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें

kan ga koni na mhane pandharichi ai | bolaviten pahin chal neten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां गा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥१॥ तेव्हां माझ्या मना होय समाधान । जाय सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥ तुका म्हणे माझी होईल माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥३॥