भजनी मालिका
← भजनांकडे परत

कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया

kasturichen rup ati hinavar | maji ase sar mol taya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥ आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥ काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥२॥ फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥३॥ तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ॥४॥