भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावें चिंतन । तें चि बरें न भेटून

karaven chintan | ten chi baren na bhetun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥१॥ बरवा अंगीं राहे भाव । तंग तोचि जाणा देव ॥ध्रु.॥ दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥२॥ तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥३॥