भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों

aisha bhagyen jalon | tari dhanya janma alon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥१॥ रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥ प्रेमामृतपान । होईल चरणरजें स्नान ॥२॥ तुका म्हणे सुखें । तया हरतील दुःखें ॥३॥