भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि

aikalya navhe khel chang | dharila sang mhanauni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि॥१॥ उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥ दुसऱ्या परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥२॥ तुका म्हणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ म्हणो ॥३॥