भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं

aika mahima avadichin | boren khay bhilatichin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥ थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला ॥ध्रु.॥ पोहे सुदामदेवाची । फके मारी कोरडे चि ॥२॥ न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥