भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । झालों मी सेवक दास तुझा

aiken panduranga vachan majhen ek | jhalon mi sevak das tujha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । झालों मी सेवक दास तुझा ॥१॥ कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥ दंभ मान माझा करूं पाहे घात । झालिया ही थीत कारणाचा ॥२॥ हीन बुद्धी माझी अधम हे याती । अहंकार चित्तीं वसों पाहे ॥३॥ तुका म्हणे मज बिघडतां क्षण । न लगे जतन करीं देवा ॥४॥