भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती

aiken vachan kamalapati | maj rankachi vinanti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥ कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥ घेई ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥२॥ तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाचि राखावा ॥३॥