भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥ पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥१॥ मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अधीरा माझ्या मना ऐक एक मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥ हे चि चिंता काय खावें म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षीराज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरी हा बाळक नंदा घरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज काळें येणें कृपा कीजे ॥१॥ अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥१॥ माझें कोठें आलें होईल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य झालों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरीनाम ॥१॥ उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥ध्रु.॥ आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥१॥ न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥१॥ आपुलें म्हणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनाथां जीवन । आम्हां तुमचे चरण । करुनी सांठवण । ते धरिले हृदयी ॥१॥ पुष्ट झाली अंगकांती ।आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥१॥ त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनी । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम