भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरीनाम ॥१॥ उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥ध्रु.

anantachya aikon kirti | jyachya chittin harinam ||1|| ulanghuni gele sindhu | ha bhavabandhu todoniyan ||dhru.

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरीनाम ॥१॥ उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥ध्रु.॥ आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें॥२॥ खुंटूनियां गेले नावा । नाहीं हेवा खोळंबला ॥३॥ न लगे मोल द्यावा रुका । भावें एका कारणें॥४॥ तुका म्हणे पाहतों वाट । उभा नीट पाउलीं॥५॥ भीमातिरीं थडवा केला । उठा चला लवलाहें ॥६॥