भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी

andhalyachi kathi | hironiyan kada loti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥१॥ हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥ चाळवूनि हातीं । साकर म्हणोनि द्यावी माती ॥२॥ तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥