भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनी । अइकिलें कानें वदे वाणी

anubhav to nahin tumachya darshani | aikilen kanen vade vani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनी । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥ नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरीहरा चाळविलें ॥ध्रु.॥ पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येईल मानूं । अंतरीं सबाह्यी कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्ततसां ॥२॥ आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडत्यास काय द्यावें । तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुम्ही कोठें ॥३॥