भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां

anantache mukhin hosil gaila | amup viththala das tumhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥१॥ माझें कोठें आलें होईल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य झालों ॥ध्रु.॥ सर्वकाळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥२॥ तुका म्हणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥३॥