भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं

anath paradeshi hin din bholen | ugalen chi lole tujhe rangin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥१॥ आपुलें म्हणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥ कासवीचे परि दृष्टी पाहें मज । विज्ञानीं उमज दावुनियां ॥२॥ तुका म्हणे तुझा जालों शरणागत । काया वाचा चित्त दुजें नाहीं ॥३॥