भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधीरा माझ्या मना ऐक एक मात । तूं कां रे दुश्चित निरंतर

adhira majhya mana aik ek mat | tun kan re dushchit nirantar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अधीरा माझ्या मना ऐक एक मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥ हे चि चिंता काय खावें म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षीराज ॥ध्रु.॥ पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥२॥ सकळयातींमध्यें ठक हा सोनार । त्याघरीं व्यापार झारियाचा ॥३॥ तुका म्हणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय असे ॥४॥