भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरी हा बाळक नंदा घरीं

anant bramhande udarin | hari ha balak nanda gharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरी हा बाळक नंदा घरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥