भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राण प्रीती ॥१॥ ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥१॥ एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥ या संतांसी निरवीं हें मज देई । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा ॥१॥ काय उणे तयापाशीं । रिद्धीसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥ प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥ काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥ कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागील ते आटी येणें घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रें ॥१॥ पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥ दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । स्थिरावली बुद्धी पायांपाशीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥ लक्ष चौ†याशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥ ऐसें ग्वही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम