भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागील ते आटी येणें घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रें

magil te ati yenen ghade sang | sutavil ang eka sutren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रें ॥१॥ पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥ आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥२॥ तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥३॥