भजनी मालिका
← भजनांकडे परत

महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती

mahura aisin phalen nahin | alin kanhin galati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥ पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥ विरुळा पावे विरुळा पावे । अवघड गोवे सेवटीचे ॥२॥ उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥ झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥ पावेल तो पैल थडी । म्हणों गडी आपुला ॥५॥ तुका म्हणे उभाऱ्यानें । खरें कोण मानितसे ॥६॥