भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा

maganen ten magon deva | karun bhakti tyachi seva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा ॥१॥ काय उणे तयापाशीं । रिद्धीसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥ कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥२॥ तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥३॥