भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागतां विभाग । कोठें लपाल जी मग

magatan vibhag | kothen lapal ji mag

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥१॥ संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥ होइन धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥२॥ तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥