भजनी मालिका
← भजनांकडे परत

माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें

maulisi sange kon | prem vadhavi tahanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥ अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥ मायबापाची उपमा। तुज देऊं पुरुषोत्तमा ॥२॥ ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥ माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥४॥ तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥ तुका म्हणे नारायणा । तुम्हां बहुत करुणा ॥६॥