भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

मन जालें भाट । कीर्ती मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥१॥ बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मनवाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ती केलें ॥१॥ भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मना एक करीं । म्हणे जाईन पंढरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळा ॥१॥ करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरी कृष्ण गोविंद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥ वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

मनाचिये साक्षी झाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥ तुम्हां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥ जातीचें तें झुरे येर येरासाठी । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मनें हरीरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥ यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥ रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥ आतां तुम्ही पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥ चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम