भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें चिंता होती आस । केला नास या काळें

magen chinta hoti as | kela nas ya kalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥१॥ तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥ मोहजाळें दुःख वाढे । ओढे ओढे त्यास तें ॥२॥ तुका म्हणे कोण देवा । आतां हेवा वाढवी ॥३॥