भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना एक करीं । म्हणे जाईन पंढरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळा

mana ek karin | mhane jain pandhari | ubha vitevari | to pahen sanvala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मना एक करीं । म्हणे जाईन पंढरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळा ॥१॥ करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरी कृष्ण गोविंद ॥ध्रु.॥ लागें संतांचिया पायां । कथे उल्हास गावया । आलों मागावया । शरण देई उचित ॥२॥ नाचें रंगीं वाहें टाळी । होय सादर ते काळीं । तुका म्हणे मळी । सांडूनियां अंतरी ॥३॥