भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर

maran majhen maron gelen | maj kelen amar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥१॥ ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥ आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥२॥ तुका म्हणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥३॥