भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनवाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ती केलें

manavachatit tujhen hen svarup | mhanoniyan map bhakti kelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मनवाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ती केलें ॥१॥ भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥ योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडेसी ॥२॥ तुका म्हणे आम्ही भोळ्या भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥३॥