प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी
premasutra dori | neto tikade jaton hari
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥ मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
premasutra dori | neto tikade jaton hari
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥ मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥
phajitakhora mana kiti tuj sangon | nako kona lagon magen magen
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥ स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥
phatakal devhara phatakal angara | phatakal vichara chalavilen
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥
phalakat to sansar | yethen sar bhagavant
फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥
phal denthinhun jhade | mag maguten na jode
फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥ म्हणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥
phal pike denthin | nimitya variyachi bheti
फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥ हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥
phalachi ton potin | ghade viyogen hi bheti
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥ करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥
phavalen tumhan magen | navaton lagen pavalon
फावलें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों ॥१॥ आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥
phirangi vakhar lokhandache vile | pari te nirale gunamol
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणामोल ॥१॥ पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळेचि ॥२॥
phiravilen deul jagamaji khyati | namadeva hatin dudh pyala
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥ भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥
phiravilin doni | kanya ani chakrapani
फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥ जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥
phukachen ten luta sar | vha re amar sadaiv
फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥ नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥
phugadi phu phugadi ghalitan ughadi rahe | laj sandoni ek eki pahe
फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥
phugadi phu savati majhe tun | haguni bharalen dhu tujhya dhunga tondavari thu
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू ॥१॥ फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥
phodilen bhandar | map gheuniyan kharen
फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥१॥ केली हरीनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥
phoduni sangadi bandhali majasi | pail thadi kaisi pave sahajin
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥ आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥
bakhayambaravant | vite charan sam nit
बखयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥ ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥
bandhanacha todun phansa | deun asha takoni
बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥१॥ नाहीं तें च घेतां शिरीं । होईल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥
baragasatin khadalen shen | milatan anna na sandi
बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥ फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥
barava jhala vevasav | pavalon chintila chi thav | drudh payin rahila bhav | pavala jiv vishranti
बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दर्शन । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥