भजनी मालिका
← भजनांकडे परत

बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि

bandhanacha todun phansa | deun asha takoni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥१॥ नाहीं तें च घेतां शिरीं । होईल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥ नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥२॥ तुका म्हणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥३॥