भजनी मालिका
← भजनांकडे परत

फावलें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों

phavalen tumhan magen | navaton lagen pavalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फावलें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों ॥१॥ आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥ घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥२॥ तुका म्हणे धडफुडा । जालों झाडा देई देवा ॥३॥