भजनी मालिका
← भजनांकडे परत

फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी

phalachi ton potin | ghade viyogen hi bheti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥ करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥ चित्त चित्ता ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥ तुका म्हणे देवा । पावे अंतरींची सेवा॥३॥