भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती

barava jhala vevasav | pavalon chintila chi thav | drudh payin rahila bhav | pavala jiv vishranti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दर्शन । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥ बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥२॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ती मधुसूदन। सम चरण देखियेले ॥३॥ जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥४॥ आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी। तुका म्हणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुर्याची ॥५॥