भजनी मालिका
← भजनांकडे परत

फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं

phoduni sangadi bandhali majasi | pail thadi kaisi pave sahajin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥ आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥ भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपला चि घात करूं पाहे ॥२॥ तुका म्हणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥३॥