भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगियाचा राजा कैलासवासी गे माये। गाती नारद तुंबर पुढे बसवा आहे

yogiyacha raja kailasavasi ge maye| gati narad tumbar pudhe basava ahe

रचनाकार: संत सेना · अभंग
योगियाचा राजा कैलासवासी गे माये। गाती नारद तुंबर पुढे बसवा आहे ॥१॥ गळां रुंडमाळा वासुकीचें भूषण । गजचर्म पांघुरला। अंगी भस्माचें लेपन ॥२॥ वास अंगीं गिरिजा देवी जटा गंगा वाहे। भोंवतें गण गंधर्व जोडोनि पाणि उभे राहे ॥३॥ सेना म्हणे जेणे भाळी चंद्र धरियेला । नमस्कार माझा तया आदि नाथाला ॥४॥