भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोक्ष आणि मुक्ति । हे तो तुम्हांसी आवडती

moksha ani mukti | he to tumhansi avadati

रचनाकार: संत सेना · अभंग
मोक्ष आणि मुक्ति । हे तो तुम्हांसी आवडती॥१॥ एका नामावांचून कांही। नसे आवडी आम्हां पाही ॥२॥ तुम्ही करावा जतन । तुमचा आहे ठेवा राखून ॥३॥ सेना म्हणे देई भेटी। कृपावंता जगजेठी ॥४॥