भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें अंतरीचें । जाणें पांडुरंग साचें

majhen antarichen | janen pandurang sachen

रचनाकार: संत सेना · अभंग
माझें अंतरीचें । जाणें पांडुरंग साचें ॥ १॥ जीवभाव त्याचे पायी। ठेउनी कांहीं न मागों ॥२॥ सुख संत समागम। घेऊ नाम आवडी ॥३॥ सेना म्हणे चुकलों साचें । आणिक वाचे न सेवी ॥४॥