भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणा हरी हरी। अवघे सकळ नरनारी

mhana hari hari| avaghe sakal naranari

रचनाकार: संत सेना · अभंग
म्हणा हरी हरी। अवघे सकळ नरनारी ॥१॥ येणें तुटेल बंधन। भाग निवारील शीण ॥२॥ प्रेमें घ्यारे मुखीं नाम। हरे सकळही श्रम ॥३॥ सेना म्हणे चित्तीं धरा। बळकट रखुमाईच्या वरा ॥४॥