भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबाप कृपावंत। तुम्ही दयाळू संत

mayabap krupavant| tumhi dayalu sant

रचनाकार: संत सेना · अभंग
मायबाप कृपावंत। तुम्ही दयाळू संत ॥१॥ घातला भार तुमच्या माथा। आवडे तें करा आतां।॥२॥ चिंतुनि आलों पायांपाशीं । न धरीं वेगळे मशी ॥३॥ सेना म्हणे पायीं मिठी । घातली न करा हिंपुटी ॥४॥